हिमकडा कोसळून एका जवानाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमधील पुंछ येथे हिमकडा कोसळून एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. पुंछमध्ये सीमेवर असलेल्या एका भारतीय चौकीवर हिमकडा कोसळला. त्यामध्ये हे जवान गाडले गेले होते. दरम्यान, येथे सध्या उणे चार डिग्री तापमान आहे.

लान्स नायक सपन मेहरा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर पंजाबचे शिपाई हरप्रीत सिंह यांना यामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. हरप्रीत यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत माहिती देताना पुंछमधील मंडी पोलीस ठाण्याचे एसएचओ अनिल शर्मा म्हणाले, गुरुवारी सकाळी बर्फाच्या वादळात सीमेवरील सवजीयान सेक्‍टरमध्ये असलेल्या फॉर्वर्ड पोस्टमध्ये भारतीय सैन्याचे दोन जवान अडकले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेनंतर तत्काळ लष्कर आणि पोलिसांकडून बचाव मोहिम राबवण्यात आली. ज्यामध्ये अडकलेल्या दोन्ही जवानांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत एका जवानाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)