मित्राच्या हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू 

वाई – जिवलग मित्रानेच मित्रावर किरकोळ भांडणावरून प्राणघात हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल दादा गोळे (वय 28, रा. मुगांव, ता. वाई) असे जखमी हल्ल्यातील मृत झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मित्राचे नाव सिद्धेश सतीश घाडगे (रा. एकसर, ता. वाई) असे आहे.

सिद्धेश आणि राहुल हे दोघे एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. या दोघांमध्ये 26 जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावर वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी सिद्धेश याने राहुलवर चाकूच्या सहाय्याने वार केले. चाकूचे वार झाल्याने राहूल गंभीर जखमी झाला होता. तसेच त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता. गंभीर राहूला उपचारासाठी तात्काळ सातारा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र राहुलची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवार, 14 रोजी पहाटे साडेसहा वाजता राहूला मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी सिद्धेश घाडगेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र निबांळकर हे अधिक तपास करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)