सेट परीक्षेस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट येत्या 23 जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत 26 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 21 फेब्रुवारीपर्यंत होती. आता ही मुदत दि. 26 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन अर्जामध्ये चूक झाली असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठीचा कालावधी 28 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठाच्या सेट परीक्षेसाठी परीक्षार्थींना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. त्यासाठीच्या तारखा आज विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. यापरीक्षेची संपूर्ण माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)