‘सीव्हिजल’ ऍप ठरतंय निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी

नाशिक – नागरिकांना आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी केंद्रीय निवडून आयोगाकडून ‘सीव्हिजल’ ऍप तयार करण्यात आले आहे. या ऍप वर सध्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत. परंतू नाशिक मध्ये मात्र हे ऍप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. कारण नाशिक मध्ये नागरीक आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारींऐवजी सेल्फी सोबतच, गुड मॉर्निंग, हाय-हॅलो चे संदेश पाठवत आहेत.

केंद्रीय निवडून आयोगाने तयार केलेल्या या ऍप वर आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत असून, तथ्य असलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. मात्र नाशिक मध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना या ऍप वर सेल्फी सोबतच, गुड मॉर्निंग, हाय-हॅलोचे संदेश आढळल्याने प्रशासन आता अशा नागरिकांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

‘सीव्हिजल’ ऍपच्या माध्यमातून सर्वात जास्त तक्रारी पुण्यातून असून १३३, त्यापाठोपाठ मुंबई उपनगर ४५, मुंबई शहर ४१, अहमदनगर ३५, नागपूर ३०, तर नांदेड मध्ये ३६ तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)