बंधारा कामावरील मजुराचा निर्घृण खून

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील घटना
सहा तासात संशयित जेरबंद

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वरपासून 25 किमीवर बिरवाडीच्या हद्‌दीतील वन विभागात जाळी बंधारा कामावरील मजूर प्रदीप भांबू कदम (वय 35) रा. गोळेगणी, ता. पोलादपूर यांचा डोक्‍यात अवजड वस्तूने प्रहार करून खून झाला होता. याप्रकरणी महाबळेश्‍वर पोलिसांनी त्यांचाच सहकारी राजू गुलाब चव्हाण वय 45 रा. शिरस, ता. शिरूर यास अटक केली आहे.पोलिसांनी अवघ्या सहा तासात संशयिताच्या मुसक्‍या आवळ्यात यश मिळवले आहे.

वन विभागात ठिकठिकाणी जाळी बंधारे बांधण्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. याठिकाणी राजू चव्हाण, त्याची पत्नी रेणुका तसेच प्रदीप कदम हे तिघे काम करत होते. तेथून बिरवाडी जवळ असल्याने तिघेही गावातील समाजमंदीरात राहत होते. रविवारी राजू चव्हाण व प्रदीप कदम हे महाबळेश्‍वरला दुचाकीवरून आले होते. तेथून काम आटोपून त्यांनी मद्यप्राशन केले व सायंकाळी बिरवाडीकडे निघाले. गावानजिक पोहोचल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या रागातून राजू चव्हाणने प्रदीप कदम यांना मारहाण करण्यास सुरूवात केली व अवजड वस्तूने कदम यांच्या डोक्‍यावर प्रहार केला. यात कदम जागीच ठार झाले. त्यानंतर चव्हाण याने मृतदेह बांधावरून खाली टाकला व घरी निघून गेला. घरी गेल्यावर त्याने सर्व प्रकार पत्नीला सांगितला व रातोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)