पोलिओ डोस न पाजल्याने फवाद खानच्या पत्नी विरोधात गुन्हा

पोलिओच्या डोसबाबत जगभरात जागरुकता पसरवली जात आहे. मात्र लहान मुलांना पोलिओचा डोस पाजण्यास विरोध करण्याच्या घटना पाकिस्तानात सारख्या घडत आहेत. असेच एक उदाहरण पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या कुटुंबामध्येही घडले आहे. फवाद खानच्या पत्नीने आपल्या लहान मुलीला पोलिओचा डोस पाजण्यास विरोध केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाहोर पोलिसांकडे पोलिओच्या टीमने याबाबत एक लेखी तक्रार दाखल केली होती. फैसल शहरात राहणाऱ्या फवाद खानच्या लहान मुलीला पोलिओ डोस पाजण्यासाठी ही टीम गेली होती. पण फवाद खानच्या पत्नीने या टीमला विरोध केला. सगळ्यांचा अपमानही केला, असे या तक्रारीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिओचे सर्वाधिक रुग्ण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायजेरिया या तीन देशांमध्ये आढळतात. पोलिओमुळे आयुष्यभरासाठी अपंगत्व आणि मृत्यूही होण्याचा धोका असतो. म्हणून देशभरात पोलिओचे डोस लहान मुलांना पाजण्यात येत असतात. ‘खुबसुरत’मधून पदार्पण करणाऱ्या फवाद खानने “कपूर ऍन्ड सन्स’ आणि “ऐ दिल है मुश्‍किल’ सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)