वाई जनता अर्बनच्या अध्यक्षांसह 17 संचालकांविरोधात गुन्हा 

महाबळेश्‍वरात बनावट दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याची तक्रार
महाबळेश्‍वर  –महाबळेश्‍वर येथील मुख्य बाजारपेठेतील मिळकतीचा खोटा दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी वाई येथील जनता अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या अध्यक्षांसह 17 संचालकांविरोधात महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महाबळेश्‍वर येथील मिळकतधारक प्रकाश रामचंद्र वाघ यांची 132, मरीपेठ महाबळेश्‍वर यांची सि. स. नं 266 व 266/2 ही मिळकत आहे. याच मिळकतीमधील मोकळ्या जागेमध्ये जनता अर्बन बॅंकेची शाखा काढावयाची असल्याचे सांगून बॅंक अधिकारी व संचालकांनी आपसात संगनमत करुन फिर्यादीच्या जागेचा 2011 मध्ये खोटा दस्तवेज बनवून सुमारे 65 लाख रुपयांची फसवणूक केली, अशी तक्रार फिर्यादी प्रकाश वाघ याने दिली आहे.

जनता अर्बन बॅंकेचे चेअरमन सुरेश दिनकर कोरडे (रा. शहाबाग फुलेनगर वाई), जगन्नाथ पांडुरंग कदम (रा. पसरणी), कृष्णराव बळवंत फरांदे (रा. ओझर्डे), खिलकुमार मेघराज चावलानी (रा. यशवंतनगर वाई), बाबा भगवान खरात (रा. सिध्दनाथवाडी वाई), श्‍यामराव बाळकृष्ण बनकर (रा. रविवार पेठ वाई), बळीराम हणमंत जगताप (रा. उडतारे), विकास दत्तात्रय फरांदे (रा. करंजे पेठ सातारा), भीमराव साधू पवार (रा. खानापूर), सौ. मंगला नंदकुमार जमदाडे (रा. फुलेनगर), दत्तात्रय लक्ष्मण सपकाळ (रा. केंजळ), सौ. विद्या दिनेश धुमाळ (रा. प्राध्यापक कॉलनी वाई), शशिकांत रानु कोरडे (रा. शहाबाग फुलेनगर वाई), प्रसाद नामदेव घाडगे (रा. मधली आळी वाई), सागर सुरेश जमदाडे (रा. शहाबाग फुलेनगर वाई), दिनेश पांडुरंग धुमाळ (रा. प्राध्यापक कॉलनी सिध्दनाथवाडी वाई) यांच्या विरोधात ही तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे जनता अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि महेंद्रसिंग निंबाळकर व श्रीकांत कांबळे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)