वृद्धाला मरण्याची इच्छा होईल अशी स्मशानभूमी बनवेल; काँग्रेस नेत्याचे अजब विधान 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी सर्व पक्षांकडून संपूर्ण ताकद लावली जात आहे. मतदाराला आकर्षित करण्यासाठी अनेक उमेदवार वेगवेगळे आश्वासने, घोषणा करत आहेत. अशामध्येच काँग्रेस नेते अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी अजब आश्वासन जनतेला दिले आहे. ८० वर्षाच्या वृद्धाला मृत्यूची इच्छा होईल अशी स्मशानभूमी बनवेल, असे अजब-गजब विधान त्यांनी केले आहे. फरीदकोट लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना ते बोलत होते.

काँग्रेस आमदार अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी म्हंटले कि, या मतदारसंघात अकाली दलाने स्मशान भूमीवर थोडेही लक्ष दिले नाही. परंतु, आमची सत्ता आल्यास सरकार स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च करेल. याठिकाणी असे स्मशानभूमी बनवू कि ८० वर्षांच्या वृद्धाला लवकर मृत्यूची इच्छा होईल आणि या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कर होतील. वरिंग एवढ्यावरच न थांबता पुढे म्हणाले, घरातील मुले म्हणतील कि या वृद्धांचा मृत्यू का नाही होत? त्यांचेही या समशानभूमीत अंत्यसंस्कर करण्यासाठी घेऊन जाता येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

दरम्यान, माझे विधान अर्धवट दाखविण्यात आले असून माझा हा उद्देश नव्हता. मी वृद्धांचा सन्मान करतो, असे अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी म्हंटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)