बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची मोडतोड

कोलकाता – पश्‍चिम बंगाल मध्ये आजच्या मतदानाच्यावेळी काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याची नोंद झाली आहे. बिरभूम मतदार संघातील नानूर, रामपुरहाट, नलहाती, आणि सिऊरी येथील मतदान केंद्रांवर दोन राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन्ही बाजूंचे अनेक लोक जखमी झाले आहेत. याच मतदारसंघातलील दुब्रजपुर भागात सुरक्षा जवानांनी मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास मज्जाव केल्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांवरच हल्ले केल्याची घटना घडली आहे. त्यावेळी हिंसक जमावाला आवर घालण्यासाठी सुरक्षा जवानांना हवेत गोळीबार करावा लागला.

वर्धमान पुर्व मतदार संघातही काहीं ठिकाणी चकमकी झाल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत. बाराबंकी येथे भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या कारवर तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे. यात त्यांच्या मोटार गाडीची नासधूस करण्यात आली. सुप्रिओ हे मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे वृत्त बाहेर पसरल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या तृणमुल कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून मोडतोड केली. तेथे जादा बंदोबस्त मागवून स्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)