हंगामी पंतप्रधान बनण्यास राजपक्षे यांना कोर्टाकडून मज्जाव

कोलंबो: श्रीलंकेतील न्यायालयाने महिंद्रा राजपक्षे यांना हंगामी पंतप्रधान बनण्यास मज्जाव केला आहे.
आज अपील न्यायालयाने राजपक्षे यांना नोटीस बजावली आणि हंगामी सरकार बनवण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून तर मंत्रिमंडळ आणि उपमंत्र्यांची नियुक्‍ती केली जाऊ शकणार नाही. श्रीलंकेच्या संसदेतील 122 खासदारांनी राजपक्षे आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणाच्या आधारे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपल सिरीसेना यांच्यासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. सिरीसेना यांनीच रनिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवून आपल्या मर्जीतील राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून नियुक्‍त केले होते. त्यानंतरच्या राजकीय नाट्यादरम्यान सिरीसेना यांनी मुदत संपण्याच्या 20 महिने आगोदर संसदच विसर्जित करून टाकली आणि नव्याने निवडणूका घेण्याची घोषणा करून टाकली.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने सिरीसेना यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली आणि निवडणूकांच्या तयारीला थांबवले. तेंव्हापासून श्रीलंकेमध्ये राजकीय अस्थिरता आणि वादंग निर्माण झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)