दहशतवादाचा मुकाबला करण्यास देशाचे नेतृत्व सक्षम 

सीआरपीएफ स्थापना दिनावेळी अजित डोवाल यांचे प्रतिपादन

गुडगांव – दहशतवादाचा मुकाबला करण्यास देशाचे नेतृत्व सक्षम आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. सीआरपीएफ या दलाच्या 80 व्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. जम्मू काश्‍मीरात पुलवामा येथे झालेला हल्ला आम्ही विसरू शकत नाही आणि विसरणारही नाही. अशा घटनांना भारताकडून नेहमीच चोख उत्तर दिले जाईल असे ते म्हणाले. डोवाल हे पंतप्रधान मोदी यांच्या विश्‍वासातील अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानवर हवाई हल्ल्याची योजना आखण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आपण काय करायचे, कोठे करायचे, आणि कधी करायचे हे आम्ही ठरवू. देशाला देण्यात आलेल्या आव्हानाला आम्ही संघटीतपणे व परिणामकारकपणे प्रत्युत्तर देत राहु असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहींद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की ही अत्यंत दुखद दुर्घटना होती. त्यात प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांचे नेहमीच स्मरण केले जाईल. सीआरपीएफने आता मागे वळून बघू नये किंवा कोणतीही चिंता करू नये असे आवाहनही त्यांनी केले.सीआरपीएफच्या जवानांनी आपली गुणवत्ता व कौशल्ये वाढवावीत असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)