जो घर सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही : नितीन गडकरी

File photo

नागपूर : आधी स्वतःच घर, मुलं, कुटुंब सांभाळा. मग देश सांभाळा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपूरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

नागपूर येथे काल अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरी यांनी कान टोचले. गडकरी म्हणाले, “भारतीय जनता पक्षासाठी, देशासाठी आपल आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक आपल्याला भेटत असतात. त्यांनी आधी आपल घर सांभाळावं. जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही, असे ते म्हणाले.

आधी आपलं घर व्यवस्थित चालवा, मुलंबाळं सांभाळा आणि मग भाजपच किंवा देशाच काम करा, असा सल्ला गडकरींनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)