देश वासियांना विश्‍वास देतो की देश सुरक्षित हातात आहे – पंतप्रधान

देशाला कोणासमोर झुकू देणार नाही

एअर स्ट्राईकची पंतप्रधानांकडून पाठराखण

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चुरू – भारताने पाकिस्तानात केलेल्या हवाई कारवाईनंतर राजस्थानातील चुरू येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी देशवासीयांना विश्‍वास देतो की देश हा सुरक्षित हातात आहे. आमच्या पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना माझे शतशः प्रणाम. या मातीतून मी आपल्याला ग्वाही देतो की मी देश कधीच झुकु देणार नाही. हा देश मी थांबू देणार नाही किंवा कुणापुढे वाकू देणार नाही. तुम्हाला शरमेने मान खाली घालावी लागेल असे मी काहीही घडू देणार नाही.

यावेळी त्यांनी 2014 मध्ये उच्चारलेल्या कवितेच्या ओळी पुन्हा एकदा उपस्थितांना म्हणुन दाखवल्या. ते म्हणाले, सौगंध है मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दुंगा, मै देश नही रुकने दुंगा, मै देश नही झुकने दुंगा.त्यांची ही प्रचार सभा होती. यावेळी त्यांनी राजकीय भाषण केले पण भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी प्रत्यक्ष हवाई हल्ल्याचे उल्लेख न करता आज तुमचा काय मूड आहे हे मी जाणतो असा उल्लेख करत भारत माता की जय चे नारे दिले. त्यानंतर मात्र त्यांनी या हल्ल्याविषयी फार तपशीलाने भाष्य करायचे टाळले.

तुमच्या विश्‍वासामुळेच आणि पाठिंब्यामुळेच मी असे काम करू शकलो असे ते म्हणाले. बाकी कशाही पेक्षा देश मोठा आहे याची जाणिव असलेले हे सरकार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद करताना राजस्थान मधिल कॉंग्रेसच्या सरकारवर टिका करताना म्हणाले की आम्ही 1 फेब्रुवारी पासून शेतकरी सन्मान योजना सुरू केली असून त्या द्वारे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा पहिला हफ्ता देखील जमा केला. मात्र, राजस्थान मधिल सरकारने येथील शेतकऱ्यांची यादी आम्हाला पाठवली नाही. राजकारणा पलिकडे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करायला हवा असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)