राजकीय पुढाऱ्यांच्या पोशाख !

वेधक- वेधक 
द.वा. आंबुलकर 

प्रत्येक व्यक्‍तीच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘ऊीशीी-ऋरलश । अववीशीी’ हे तीन मुख्य पैलू असतात. वैयक्तिक स्वरूपात व्यक्तीला लागू होणाऱ्या या बाबी सामायिक वा राजकीय संदर्भात राजकीय पुढाऱ्यांना पण लागू होतात. या पुढाऱ्यांच्या संदर्भात वरील तीन ‘ऊीशीी-ऋरलश । अववीशीी’ म्हणजे पोशाख ही बाब सर्वाधिक महत्त्वाची असते ही एक वस्तुस्थिती आहे.

पोशाखाच्या संदर्भात विशेष चोखंदळ असणारे आपले पुढारी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील मोहंमद अझिमूर रहमान या युवा ड्रेस डिझाईनरचा सल्ला व शैली यांना विशेष पसंती देतात. मोहंमद रहमान यांच्या डिझाईननुसार कुर्ता-पायजमा-जाकीट या पेहरावाला राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव, जन-लोकशक्‍ती पार्टीचे मुख्य रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता, भाजप प्रवक्‍ते शाहनवाज हुसैन व राजीव प्रताप रुडी इ. मंडळी आपला पोशाख करतात एवढे सांगणे पुरेसे ठरते. मोहंमद रहमान यांच्या मते आपली नेतेमंडळी आपल्या पोशाखाच्या संदर्भात नेहमीच काळजी घेतात व त्यांच्या या पोशाखी काळजीची पूर्तता करणे हाच मोहंमद रहमान यांचा व्यवसाय झाला आहे.

तसे पाहता बिहारच्या एका शहरात सर्वसाधारण स्वरूपाचे शिलाई-काम करणाऱ्या मोहंमद रहमान यांच्या व्यवसायाला राजकीय पुढाऱ्यांसाठी विशेष पोशाख शिवण्याची पहिली संधी 2003 मध्ये लालूप्रसाद यादवांमुळे प्राप्त झाली. त्यावेळी लालूप्रसाद यादवांना पाकिस्तानमध्ये जायचे होते व त्यादृष्टीने त्यांनी मोहंमद रहमान यांना विशेष स्वरूपाचा कुडता पायजमा बनविण्यास सांगितला. त्यानुसार मोहंमद रेहमान यांनी बनविलेला कुर्ता-पायजमा त्यांना एवढा पसंत पडला की ती शैली लालूजींनी कायमची स्वीकारली. एवढेच नव्हे तर गेली 10 वर्षे लालूजी केवळ मोहमंद रहमान यांचेकडूनच आपले कुर्ते शिवून घेत आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील पुढाऱ्यांकडून त्यांच्या कुडता-पायजमा व जाकीट या पोशाखाची विविध पुढाऱ्यांकडून मागणी-विचारणा होत असल्याने मोहमंद रहमान यांनी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातून राजधानी दिल्लीत आपला मुक्काम हलवून दिल्लीत त्यांनी एक छोटेखानी स्टुडिओच थाटला आहे. त्यांच्या मते भारतीय राजकारणी आणि राजकारण्यांसाठी त्यांच्या पोशाखाच्या संदर्भात कुर्ता-पायजम्याला पर्याय नसल्याने आज त्यांना कायमस्वरूपी व प्रतिष्ठित असा व्यवसाय प्राप्त झाला आहे.
राजकीय पुढाऱ्यांची व्यग्रता लक्षात घेता मोहंमद रहमान आपल्या स्टुडिओवजा दुकानात खास करून कुडता, पायजमा, जाकीट इ. साठी लागणारे सर्व प्रकारचे कापड उपलब्ध ठेवतात.

यामध्ये अगदी सरकारी योजनांतर्गतच्या खादीपासून ठिकठिकाणच्या सिल्क, आयरिश व चीनचे लिनन, कॉटन, उच्च दर्जाची खादी-कोसा इ. साऱ्याचा समावेश असतो. पुढाऱ्यांची पांढरा कापडाला विशेष पसंती असते व त्यांचे कपडे शिवताना खूपच काळजी घ्यावी लागते असे मोहमंद रहमान आपल्या स्वानुभवातून सांगतात. प्रसंगी पुढारी-मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांचे पोशाख शिवण्यासाठी मोहंमद रहमान 10 ते 12 हजार रुपये घेतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमधून फॅशनसह शिवणकामाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मोहमंद रहमान यांनी निवडणूक काळात विविध नेत्यांसाठी रातोरात डझनांनी पोशाख शिवण्यापासून एका मंत्र्याची ऐनवेळी मंत्रिपदी वर्णी लागल्यावर केवळ 2 तासांत त्यांचा पोशाख शिवण्याचा यशस्वी विक्रम पण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)