लोकसभा निकालांचा ‘योग्य’ अंदाज केवळ शहांच्या नातीलाच : आव्हाडांचा टोला

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निवडणूक चाणक्य म्हणून देशभरामध्ये आपलं बिरुद कायम करणाऱ्या अमित शहा यांनी आज गुजरातेतील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज देशभरातील भाजप नेत्यांसह मित्रपक्षांच्या प्रमुखांनी देखील जातीने हजेरी लावली होती. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हा लवाजमा निघाला असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या नातीस कडेवर घेतले होते. डोक्यावर निळ्या रंगाची हॅट घातलेली अमित शहांची नात आजोबांच्या कडेवर बसली होती मात्र अमित शहा यांनी तिच्या डोक्यावरील हॅट काढून तिला भाजपची टोपी घालण्याचा प्रयत्न केला असता तिने डोक्यावरची भाजपची टोपी काढून टाकली. अमित शहा तसेच इतरांनीही प्रयत्न करून देखील तिने आपल्या डोक्यावर भाजपची टोपी काही टिकू दिली नाही.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी लगेच भाजपला घेरण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सदर घटनेबाबत काव्यात्मक टीका केली आहे. आपल्या ट्विटर खात्यावर आव्हाडांनी या घटनेला अपशकून घोषित करत एक फोटो शेअर केला असून त्यासोबतच “आजोबाची टोपी नातीने उडवली, भक्तांची काया ऐकताच थरथरली. अपशकून झाला म्हणून बोबडी वळली, देशाची हवा या चिमुरडीला कशी काय समजली.” अशी काव्यात्मक रचना देखील शेअर केली आहे.

https://twitter.com/Himansh256370/status/1111918273615024128

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)