सहमतीचा दावा साफ खोटा ; अकबर यांच्या दाव्यावर पल्लवीचा खुलासा 

वॉशिंग्टन – मोदी सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप करणाऱ्या अमेरिका स्थित भारतीय महिला पत्रकाराने या विषयी अकबर यांनी केलेला दावा साफ फेटाळून लावला आहे. आमच्यात संबंध होते पण ते सहमतीचे होते असे विधान अकबर यांनी केले होते. त्यांचे हे विधान पुर्ण खोटारडेपणाचे आहे. त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करूनच आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असे पल्लवी गोगोई या महिलेने स्पष्ट केले आहे.

अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पल्लवी गोगोई या अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडिओ या माध्यमाच्या मुख्य संपादक आहेत. त्यांनी म्हटले आहे की आपण आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या संबंधात वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात लेख लिहुन जो दावा केला आहे त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. आपल्यावर अकबर यांनी जे अत्याचार केले त्याविषयी यापुढेही आपण बोलत राहु त्यातून त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनाही खरे बोलण्याचे बळ मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. अकबर पिडीत महिलांनी आता न घाबरता पुढे येऊन त्यांच्या अत्याचाराच्या कहाण्या जगाला ओरडून सांगावत असाव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)