बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचे कॉंग्रेसकडून प्रयत्न 

सभापतींकडून कागदोपत्री पुराव्यांचा अभ्यास

कॉंग्रेसने केलेल्या विनंतीवर सभापतींकडून विचार केला जात आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांचा अभ्यास केला जात आहे. सभापतींनी कॉंग्रेसच्या नेत्यांना आणखी पुरावे असतील तर ते सादर करण्यासही सांगितले आहे. भाजपच्या फितवण्यामुळे कॉंग्रेसचा राजीनामा देणारे हे आमदार अपात्र ठरवण्यास पात्र आहेत, असे कॉंग्रेसच्या बैठकीत ठरले. मात्र कॉंग्रेस पक्ष सोडलेला नाही, असे स्पष्ट करणाऱ्या रामलिंगा रेड्डी यांच्यावर अपात्रतेची कारवाई न करण्याचे कॉंग्रेसने ठरवले अहे, असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल गुंडू राव यांनी सांगितले.  

बेंगळूरु – कर्नाटकातील आघाडीचे सरकार वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये कॉंग्रेसने बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेच्या सभापतींनी या संकटसमयी हस्तक्षेप करावा आणि बंडखोरांना अपात्र ठरवावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. भाजप या आमदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज सभापती के.आर. रमेश कुमार यांची भेट घेतली आणि बंडखोर आमदारांना

पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवण्याची मागणी केली. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये तसा ठरावही करण्यात आला आहे. कालच आघाडी सरकारमधील कॉंग्रेस आणि निधर्मी जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा मार्ग खुला करून दिला होता. त्यानंतर आज झालेल्या कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत बंडखोरांच्या अपात्रतेचा ठराव केला गेला. सभापतींकडे जाण्यापूर्वी कॉंग्रेसचे नेते आणि आमदारांनी विधानसभेसमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.

अलिकडेच पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार आर.रोशन बेग यांना अपात्र करण्याबाबतही सभापतींना विनंती करण्यात आली. मात्र बेग यांनीच आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे सादर केला. अपात्रतेच्या कारवाईचा बंडखोर आमदारांवर काहीही परिणाम झालेला नाही. आपले राजीनामे मागे घेण्याचा काही प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे बंडखोरांपैकी एक आमदार एस.टी. सोमासेकर यांनी पत्रकारांना सांगितले. रमेश जरकिहोली आणि बाराती बसवराज या अन्य आमदारांनीही अशीच भूमिका मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)