कॉंग्रेसने गांधी आडनावाचा राजकीय ब्रॅन्ड केला : जेटली यांची टीका

नवी दिल्ली: कॉंग्रेसने गांधी या आडनावाचा राजकीय ब्रॅन्ड केला, अशा शब्दामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेसचे आव्हान भाजप आनंदाने स्वीकारेल, असेही त्यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“सरदार पटेल यांच्या वडिलांचे नाव होते.’ असे शिर्षक असलेल्या पोस्टमध्ये जेटली यांनी कॉंग्रेसच्या घराणेशाहीमध्ये गुणवत्ता आणि योग्यतेला कोणतेच स्थान नाही. केवळ एकाच घराण्याभोवती सर्वांनी गर्दी केली आहे, असे म्हटले आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबीयांच्या नावांचा उल्लेख केल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर जेटली यांनी ही पोस्ट लिहीली आहे.

“अपरिचित कुटुंबातील पंतप्रधान मोदी आणि गुणवत्तेपेक्षा केवळ घराणेच असलेल्यांमध्ये 2019 ची निवडणूक व्हावी, असे कॉंग्रेसला वाटत असेल, तर भाजप हे आव्हान स्वीकारायल तयार आहे. हाच निवडणूकीचा अजेंडा होऊ द्यावा.’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसकडून पंतप्रधानांच्या आईचे वय हा निवडणूकीतील वादाचा विषय केला गेला. वडिलांच्या अनभिज्ञतेबाबत शेरेबाजी केली गेली. भारतात घराणेशाही निर्माण करणे हाच कॉंग्रेसचा हेतू आहे. प्रसिद्ध घराणे नाही हा राजकीय मुद्दा केला गेला आहे. लक्षावधी राजकीय कार्यकर्ते सर्वसामान्य पार्श्‍वभुमी असलेला कुटुंबातून आहेत. मात्र कॉंग्रेसच्या निकषानुसार ते अपयशी ठरतील. कॉंग्रेसने आडनाव हा राजकीय ब्रॅन्ड केला आहे. देशातील रस्ते, शहरे, पूल, विमानतळ, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज, स्टेडियम सारे काही गांधी राजघराण्याशी जोडले. जणू काही इतरांशी काहीही संबंधच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)