महामार्गावरील दुभाजकामधील फुलझाडांची स्थिती दयनीय

सातारा – सातारा पुणे महामार्ग वरील वाढेफाटा ते आनेवाडी टोलनाका दरम्यान असणाऱ्या दुभाजकामध्ये लाखो रुपये खर्च करुन हाजारोच्या संख्येने फुलझाडे लावण्यात आली. यामुळे महामार्गची शोभा वाढली परंतू लावलेल्या फुलझाडे सध्या देखभाली अभावी कोमजून चालली असल्याचे दिसून येत आहे. रस्ते विकास महामंडळाने या दुभाजकामध्ये गाळाची माती पसरुन वाढेफाटा ते आनेवाडी टोलनाका दरम्यान रंगी बेरंगी व वेगवेगळया प्रकारची असंख्य रोपाची लागवड केली पावसाळ्यात ही फुलझाडे तरारली.

रंगीबेरंगी फुलझाडे फुलल्याने ये-जा करणारे प्रवासी व वाहनचालक सुखावले. फुलझाडांची देखभाल झाल्याने अल्पवधीतच वाढेफाटा ते आनेवाडी टोलनाकामधील दुभाजक हिरवाई नटल्याचे दिसून येत होते. यामुळे या मार्गवरुन प्रवास करणे सर्वानाच सुखकर वाटत होते. परंतू नव्याचे नवलाई संपल्याने सध्या या मार्गवरील दुभाजकामधील फुलझाडाची स्थिती अंत्य्त दयनीय झाली आहे.

-Ads-

देखरेखी अभावी फुलझाडे कोमजून गेली असून त्यात वाढलेले गवत फुलझाडांना मारक ठरत आहे. दुभाजकात वाढलेले गवतामुळे फुलझाडे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन लावण्यात आलेली फुलझाडे केवळ देखरेखी अभावी नष्ट होत असल्याने निसर्ग व वृक्ष प्रेमीमधून संताप व्यक्त केला जात आहे. संबधित विभागाने तातडीने दखल घेवून दुभाजकामधील वाढलेले गवत कापून फुलझाडांना नवसंजीवनी मिळावी ही निसर्ग प्रेमींची अपेक्षा आहे.

 

फुलझाडांसाठी उपाययोजना न केल्याने निसर्ग प्रेमींमधून संताप 

प्रवास सुखकर व आंनददायी व्हावा यासाठी रस्ते विकास महामंडळाने महामार्गचे रुंदीकरण केले सुरक्षित वाहतूक धोरण ठरविताना आंनददायी प्रवास हे सूत्र ठेवून दुभाजकाचे सुशोभिकरण केले पावसाळयापूर्वी या मार्गवरील दुभाजकामधील असणारी सर्व काटेरी झाडे व गाजरगवत काढून यामध्ये नदीच्या गाळाची माती टाकण्यात आली यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला रंगीबेरंगी व वेगवेगळया प्रकारच्या फुलझाडाची लागवड शास्त्रीय पध्दतीने झाल्याने अल्प्वधीत या दुभाजकमधील फुलझाडे बहरली. प्रवासाचा आंनद द्विगुणित करीत. परंतु सध्या ही फुलझाडे कोमजून व वाळून गेल्याने ये-जा करणाऱ्या असंख्य निसर्ग प्रेमींचा संताप अनावर होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)