युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरमध्ये फुटणार 

– 24 मार्च रोजी होणार पहिली सभा 

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरमध्ये फुटणार आहे. कोल्हापूरमध्ये रविवार, 24 मार्च रोजी प्रचाराची पहिली सभा होणार आहे. करविर निवासीनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.

-Ads-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशीरा “मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीत प्रचारसभा तसेच संयुक्त मेळाव्यांचा तपशील ठरविण्यात आला. करविरनिवासिनी श्री अंबाबाईचा आशीर्वाद घेउन रविवार 24 मार्च रोजी युतीची पहिली सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे. त्याआधी युतीचे संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. 15 मार्च रोजी अमरावती-नागपूर, 17 मार्च औरंगाबाद-नाशिक, 18 मार्च पुणे-नवी मुंबई असे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यांना युतीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे या मेळाव्यांना मार्गदर्शन करतील. मुंबईतील कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्याची तारीख लवकरच ठरविण्यात येणार आहे. भाजपा शिवसेनेचा संयुक्त जाहीरनामा देखील लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)