आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बॅंकांचा सहकारमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई: आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्धा, बुलढाणा आणि नागपूर जिल्हा बॅंकांकडून शेतकऱ्यांना त्वरित शेती कर्जपुरवठा व्हावा यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या बॅंकांच्या अडचणीसंदर्भात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी बॅंकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त एस. सोनी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या जिल्हा बॅका आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने  शेतकऱ्यांना शेतीसाठीचा कर्ज पुरवठा करण्यास अडथळा येत आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी अडथळा येऊ नये आणि वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला बॅंक प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी नाबार्डची मान्यता मिळावी यासाठी  प्रयत्न सुरू आहेत, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)