शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे “कायाकल्प’

-आरोग्य कोठी, क्षेत्रीय कार्यालयांचे रुपडे पालटणार
– आयुक्त सौरभ राव यांच्या पुढाकारातून प्रकल्प हाती
 
पुणे  – महापालिकेच्या शहरातील आरोग्य कोठ्या तसेच क्षेत्रीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी “कायाकल्प’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्या अंतर्गत आरोग्य कोठ्यांची रचना, क्षेत्रीय कार्यालयांची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी होणारे विद्रुपीकरण थांबविण्यावर भर दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शहराचे सार्वजनिक आरोग्य तसेच सार्वजनिक स्वच्छता धोक्‍यात आली आहे. महापालिकेकडून शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वर्षाला जवळपास 400 कोटींचा खर्च केला जातो. तर दैनंदिन स्वच्छतेसाठी जवळपास प्रत्येक दिवशी तब्बल 10 हजार कर्मचारी रस्त्यावर असतात. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आढळून येते. त्यात प्रामुख्याने काही भाग खासगी जागांचा असला तरी, शासकीय आणि त्यातही महापालिकेच्या कार्यालयांमध्ये अस्वच्छता असते. त्यामुळे स्वच्छतेचे काम आपल्यापासूनच सुरू करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्या अंतर्गत प्रशासनाकडून महापालिकेच्या 190 आरोग्य कोठ्यांचा “मेक ओव्हर’ केला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या अंतर्गत त्यांची रचना, संगसंगती, साहित्य ठेवण्यासाठी जागा तसेच कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सुविधांसह पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या बरोबरच पालिकेच्या क्षेत्रीत कार्यालये आणि इतर इमारतींच्या स्वच्छता आणि अंतर्गत रंगरंगोटीकडे लक्ष दिले जाणार असून ही कार्यालये एकसारखी असावीत यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विद्रुपीकरणावर लक्ष केंद्रीत करून सार्वजनिक ठिकाणांचा वापर कचरा टाकण्यासाठी अथवा स्वच्छतेसाठी न होता. तो सार्वजनिक हितासाठी तसेच नागरी वापरासाठी कशा पध्दतीने करता येईल यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)