शहरातील घरगुती सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश 

नगर  – शहरातील तपोवन रोड भागातील एका घरावर छापा टाकून पोलिसांकडून पाच पुरुषांसह एका महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

अर्जुन भुजबळ, संतोष भुजबळ, समीर शेख, कैलास क्षिरसागर, अक्षय दरंदले ही अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरातील तपोवन भागात वेश्‍या व्यवसाय चालू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वरी पांढरे, पोलीस कर्मचारी विश्‍वास गाजरे, तरटे, शाईन पठाण आदींच्या पथकाने तपोवन रोड भागातील श्रावणी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकला. यावेळी महिला व पुरुष आढळून आले. पोलिसांनी पाच पुरुष व एका महिला एजंटला ताब्यात घेतले आहे. तर एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)