…यासाठीच बालाकोटची निवड; अनेक दहशतवादी ठार – विजय गोखले 

नवी दिल्ली – भारतीय वायूसेनेने आज पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामध्ये मोठया संख्येने दहशतवादी मारले गेल्याचेही सांगण्यात आले. खात्रीलायक गुप्तचरांच्या माहितीवरुन हा हवाई हल्ला करण्यात आला.

परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले कि, देशावर आणखी हल्ले होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. इंटेलिजेंसच्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद देशात अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत होते. यासाठी जिहादींना ट्रेनिंग दिली जात होती. यामुळे सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे होते. या हल्ल्यात जैशचे अनेक दहशतवादी, ट्रेनर्स आणि कमांडर मारले गेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालाकोटमधील ट्रेनिंग कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा नातेवाईक आहे. त्यामुळे जैशच्या ट्रेनिंग कॅम्प आणि दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते. सैन्याने सामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)