आंध्रप्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पुन्हा एकाच मंचावर

विशाखापटनम : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री तथा टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांची आज विशाखापटणम येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. चंद्रबाबु या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावल्याने देशभरातील राजकीय जाणकारांची नजर या सभेवर होती.

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या काही काळामध्ये राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी विशेष प्रयत्नन केले होते. मात्र मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस सोबत वाटाघाटी यशस्वी न होऊ शकल्याने सध्या भाजपा विरोधी पक्ष स्वबळावर अथवा प्रादेशिक पक्षांशी आघाडी करून लढताना दिसत आहेत. चंद्रबाबू नायडू यांनी महाआघाडीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विशेष गळ घातली होती यातूनच आता चंद्रबाबुु नायडू ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा एकाच मंचावर उपस्थित राहिल्याचे दिसले.

https://twitter.com/ANI/status/1112352343742443521

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)