डीएसके दाम्पत्यासह मुलावर न्यायालयात आरोपपत्र 

350 गुंतवणूकदारांची 19 कोटी 77 लाखांची फसवणूक केल्याचा उल्लेख

कोल्हापूर – गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम परत देण्यास असमर्थ ठरलेल्या डीएसके समुहाचे सर्वेसर्वा डीएसके तथा दीपक कुलकर्णी, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या विरोधात कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषणने विशेष न्यायाधीश ए. यू. कदम यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

साडेचार हजार पानी दोषारोपपत्रात 350 गुंतवणूकदारांची 19 कोटी 77 लाख 80 हजार 517 रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. 350 साक्षीदारांचा त्यात समावेश आहे. डीएसके ग्रुपच्या टोप (ता. हातकणंगले) येथील एक, मालगाव (ता. मिरज) येथील पाच व सोलापुरातील एक अशा 100 कोटींच्या सात मालमत्तांवर टाच आणून संरक्षित करण्यात आल्या आहेत, असे आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी स्पष्ट केले आहे.ठेवीदारांचे हितरक्षण कायद्यान्वये (एमपीडीए) व फसवणूक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांच्या आधारे विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फसवणूकप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू आहे. त्यामुळे पुरवणी दोषारोपपत्रही लवकरच दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांची डीएसके ग्रुपचे प्रमुख दीपक कुलकर्णी, पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांनी 2 हजार 43 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार नोव्हेंबर 2016-17 मध्ये उघडकीला आला होता. मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातही साडेतीनशेवर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे चव्हाट्यावर आले होते. गुंतवणूकदार बाजीराव किल्लेदार (रा. कळंबा) यांनी कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. किल्लेदार यांच्या फिर्यादीनंतर शहर, जिल्ह्यातून तक्रारींसाठी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला होता.

फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन दि. 28 जानेवारी 2018 मध्ये गुन्हे अन्वेषणकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला. चौकशीअंती 350 गुंतवणूकदारांची 19 कोटी 77 लाख 80 हजार 517 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले होते.
तपासाधिकारी शेंडे व पथकाने डीएसके ग्रुपच्या कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील मालमत्तांचा शोध घेऊन, त्याची यादी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे पाठविली होती. त्यानुसार संबंधित मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. प्राधिकृत अधिकारी म्हणून सुभाष भागडे यांची नियुक्ती डीएसके ग्रुपची मालमत्ता संरक्षित करण्यात आली असून, त्यावर प्राधिकृत अधिकारी म्हणून मावळ (जि. पुणे) येथील उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)