विकिलिक्‍सच्या असांजें यांच्या विरोधात आरोपपत्र 

वॉशिंग्टन – अमेरिका सरकारची अनेक गुप्त कागदपत्रे सन 2010 मध्ये फोडून जगभर खळबळ माजवणारे विकिलिक्‍स संस्थेचे संस्थापक ज्युलियन असांजे यांच्या विरोधात अमेरिकन सरकारने आज कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. तथापी त्यांच्यावर नेमक्‍या कोणत्या कारणास्तव आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे याची माहिती मात्र लगेच मिळू शकलेली नाही. तथापी कोर्टात आज झालेल्या सुनावणीच्यावेळी असांजे यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले की अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांच्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यात त्यांच्याशी संबंधीत नसलेल्या आरोपांचाहीं समावेश आहे. ही चूक न्याय विभागाच्या लक्षात आल्याने त्यात दुरूस्ती करण्याचे त्यांनी यावेळी मान्य केले.

न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ संगणकीय कटपेस्टचा वापर करून हे बनावट आरोप आमच्या अशिलाच्या विरोधात रचले आहेत असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. असांजे यांना या प्रकरणात अटक होईपर्यंत त्यांच्या विरोधातील आरोपपत्र सीलबंद पाकिटातच ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)