केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण हा एक इलेक्‍शन स्टंट : मायावती

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय योग्य असला तरी तो एक इलेक्‍शन स्टंट आहे असे बहुूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. जरी हा अपरिपक्व निर्णय असला तरी आर्थिक मागासांना आरक्षण देण्यास आमचा पाठिंबाच आहे असे त्यांनी म्हटले आहे.

हा निर्णय लागू व्हावा अशी जर सरकारची धारणा असती तर सरकारने तो खूप आधीच घेतला असता असेही त्यांनी नमूद केले आहे. मायावती यांनी या संबंधात एक निवेदन प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आर्थिक मागासांनाहीं आरक्षण लागू करावे अशी बहुजन समाज पक्षाची अनेक दिवसांची मागणी होती. ती सरकारने आज मान्य केली असली तरी त्यांनी अत्यंत अपरिपक्वपणे आणि कोणतीही तयारी न करता हा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेला हा सरळसरळ इलेक्‍शन स्टंट आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. उच्चवर्णीय मध्यम वर्ग हा भाजपचा मोठा पाठीराखा आहे पण नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपला मोठा दणका बसल्यानंतर या वर्गाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर खूष करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची टीका अन्य पक्षांनीही केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)