पुणे जीएसटी कार्यालयातील दोन अधीक्षकांना लाच घेताना पकडले

पुणे – केंद्रीय गुन्हे आन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) दोन अधीक्षकांना( सुपरिटेंडेंट) एक लाख रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी पुण्याच्या जीएसटी कार्यालयात कार्यरत आहेत.

सीबीआयकडे या दोघांविरोद्ध लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वर्ष 2016-17 चे सर्विस टॅक्‍स लायबिलिटी विषय मार्गी लावण्यासाठी या आरोपींनी करदात्याकडे तीन लाख रूपयांची लाच मागितली असल्याचा आरोप या दोघांवर लावण्यात आला होता. त्यानुसार सीबीआयने केल्लेल्या छुप्या कारवाईअंतर्गत हे दोन्ही अधिकारी एक लाख रूपयांची लाच घेतना पकडण्यात आले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच या दोन्ही आरोपींना सुनावणीसाठी विशेष न्यायाधिशासमोर प्रस्तुत केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)