मतदार यंत्रांच्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे होते बंद

प्रातिनिधिक छायाचित्र

निवडणूक आयोगाने केले मान्य

नवी दिल्ली: मध्यप्रदेशात ज्या ठिकाणी मतदानानंतर इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद होते अशी कबुली निवडणूक आयोगाने दिली आहे. मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक आयोगानेच ही माहिती ट्विटरवर दिली आहे. तथापी सर्व इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रे अत्यंत सुरक्षित असून त्यात कोणत्याही मशिन मध्ये फेरफार करण्यात आलेला नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात हा प्रकार घडला होता. त्या प्रकरणी विरोधी पक्षांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर याची प्राथमिक चौकशी करण्यात आली त्यात ही बाब खरी असल्याचे मान्य करण्यात आले. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजून 19 मिनीटे ते 9 वाजून 35 मिनीटांच्या अवधीत तेथे वीज गेल्याने हे कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले आहे. त्या कालावधीतील रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यांमध्ये झालेले नाही. तथापी आतील सर्व मशिन्स सुरक्षित आहेत असे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर तेथे ईन्व्हर्टर आणि अतिरीक्त एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहेत. जुन्या कारागृहातील स्ट्रॉंग रूम मध्ये ही यंत्रे ठेवण्यात आली आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या दारालाही कुलुप नव्हते या विरोधकांनी केलेल्या तक्रारीचीही निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.

मंत्र्याच्या हॉटेल्सवर मतदान यंत्रे नेणारा निलंबीत
सागर जिल्ह्यातील खुराई मतदार संघातून भाजपचे नेते व विद्यमान गृहमंत्री भुपिंदरसिंह हे निवडणूक लढवत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेच्यावेळी काहीं मतदान यंत्रे भुपिंदरसिंह यांच्या हॉटेल मध्ये नेली होती अशी तक्रारही विरोधकांनी केली होती. त्याचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही यंत्रे भुपिंदरसिंह यांच्या हॉटेल्स मध्ये नेणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. तथापी त्याने जी यंत्रे भुपिंदरसिंह यांच्या हॉटेल्स मध्ये नेली होती ती मतदानासाठी वापरली गेली नाहीत असेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तथापी त्यांच्या या खुलाशाने कॉंग्रेस व अन्य विरोधकांचे मात्र समाधान झालेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)