मतदारांना प्रत्येकी तीनशे रूपये प्रमाणे होणार होते वाटप
अंदीपट्टी – तामिळनाडुतील अंदीपट्टी येथे टीटीव्ही दिनकरण यांच्या पक्षाशी संबंधीत एका उमेदवाराच्या ठिकाणावर घालण्यात आलेल्या छाप्यात दीड कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. प्रत्येक मतदाराला तीनशे रूपये या प्रमाणात ही रक्कम वाटली जाणार होती कारण तशा हिशोबाने या नोटा वेगवेगळ्या पाकिटात ठेवण्यात आल्या होत्या. अशा प्रकारची 94 नोटांची पाकिटे या छाप्यात सापडली आहे.हा उमेदवार एएमएमके पक्षाशी संबंधीत आहे.
आयकर विभाग आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यावेळी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पथकाशी हुज्जत घालून त्यांना तेथून हुसकाऊन लावण्याचा प्रकार केला त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शेवटी पोलिसांची मदत मागवून ही कारवाई पुर्ण करण्यात आली.