दरोड्यातील कार जप्त

कराड  – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेणोली (ता. कराड) येथील शाखेवर टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील स्वीफ्ट डिझायर कार तालुका पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, बिहारला पळून गेलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शुक्रवारी (दि. 22) रवाना होणार आहे.

शेणोली येथील महाराष्ट्र बॅंकेवर दरोडा टाकून संशयीतांनी ताकारीमार्गे इस्लामपूरातून कोल्हापूरकडे पलायन केले होते. दरोडा टाकल्यानंतर पळून जाताना संशयीतांनी 180 च्या वेगाने अर्ध्या तासात कार कोल्हापूरपर्यंत नेली होती. गुन्ह्यात वापरलेली कार स्वीफ्ट डिझायर असून ती टुरिस्ट कार आहे. तिचे पासिंग तेलंगणाचे आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच कार खरेदी करण्यात आलेली आहे. कार ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाने कारच्या मूळ मालकालाही जबाबासाठी कराडला आणले आहे. तपासकामी कार जप्त करण्यात आली असून आता बिहारला पळून गेलेल्या दोन संशयीताला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक शुक्रवारी (दि. 22) रवाना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)