बेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली 

मुठा कालवा फुटी प्रकरण : कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाचा दावा

मुंबई – मुठा नदीवरील कालवाच्या भिंतीजवळ बेकायदा उभारण्यात आलेले बांधकाम आणि त्यात वास्तव्यात असलेल्या लोकांमुळेच हा कालवा फुटला. तर केवळ दुर्घटनेत केवळ 40 कुटूंबियच नुकसान भरपाईस पात्र असल्याचा दावा कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाने केला.पुण्यातील सिंहगड रोडनजीक मुठा नदीवरील कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ऍड. असीम सरोदे, विद्या बाळ, विश्‍वांबर चौधरी, शिवाजी गदादे-पाटील आणि नगरसेविका प्रिया गदादे-पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित दाखल केल्या आहेत. या याचिकांवर उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

-Ads-

यावेळी कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाने हा दावा केला.तसेच या परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांकडून या भागात कचरा टाकला जातो. त्यामुळे घुशी उंदिरांनी तिथे बिळे काढली आहेत. त्यामुळे कालव्या लगतची जमीन भुसभूशीत होऊन ही दुर्घटना घडली.तर या दुर्घटनेतील केवळ 40 जणांचे पुनर्वसन होऊ शकते आणि त्यांना 50 ते 95 हजार इतपत नुकसानभरपाई देता येऊ शकते, असेही न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. याची दखल न्यायालयाने घेत नुकसान भरपाईला कोणत्या निकष लावला गेला, अशी विचारणाही न्यायालयाने करून अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेने कोणती पावले उचलली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)