अमित शहांच्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली

कोलकाता: भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. या रथयात्रेमुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असे पश्‍चिम बंगालने म्हटल्यामुळे न्यायालयाने भाजपला ही परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपने कूचबिहारपासून सुरु होणारी ही रथयात्रा पुढील सुनावणीपर्यंत स्थगित केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे रथयात्रांवरून भाजप आणि सत्तारूढ तृणमूूल कॉंग्रेसमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र बनण्याचे संकेत मिळत आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालमधील स्थिती बळकट करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यातून त्या राज्यात तीन वेगवेगळ्या दिवशी तीन ठिकाणांहून रथयात्रा काढण्याची भाजपची योजना आहे. पहिली रथयात्रा कूचबिहार जिल्ह्यातून 7 डिसेंबरला काढण्यात येईल. तो मुहूर्त जवळ आला असतानाच भाजपने बुधवारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. रथयात्रांच्या परवानगीसंदर्भात सादर केलेल्या अर्जांना राज्य प्रशासन आणि पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

-Ads-

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या राजकारणासाठी रथयात्रा “गेमचेंजर’ ठरतील, असा दावा भाजपने केला आहे. रथयात्रांमुळे राज्यात आमच्यासाठी अनुकूल लाट येईल. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी त्या निर्णायक ठरतील, असे भाजपने म्हटले आहे. रथयात्रांच्या माध्यमातून भाजप नेते पश्‍चिम बंगालमध्ये तब्बल 10 हजार किलोमीटर प्रवास करतील. सुमारे 40 दिवसांच्या कालावधीत त्या राज्यातील सर्व 42 लोकसभा मतदारसंघांमधून रथयात्रा जाईल, असे भाजपने पूर्वी म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)