राफेल वरील कॅगचा अहवाल आज सादर होणार

नवी दिल्ली : राफेल व्यवहाराच्या संबंधातील कॅगचा अहवाल उद्या मंगळवारी संसदेत सादर होणार आहे. संसदेचे अधिवेशन 13 फेब्रुवारीला समाप्त होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी हा अहवाल संसदेत सादर होणार आहे. संसदेचे हे अखेरचे अधिवेशन असून त्यानंतर देशात लगेच लोकसभा निवडणुका होणार आहेत.

राफेल व्यवहारावरून कॉंग्रेसने मोदींना चांगलेच घेरले असले तरी सरकारने आणि भाजपने त्यांचा चांगला मुकाबला करीत त्यांचे सारे दावे फोल ठरवले आहेत. तथापि एका राष्ट्रीय दैनिकातून या प्रकरणातील नवनवीन तथ्ये समोर आणली जात असल्याने उद्या सादर होणाऱ्या राफेल विषयीच्या कॅग अहवालात नेमका काय निष्कर्ष काढण्यात आला आहे या विषयी औत्स्युक्‍य निर्माण झाले आहे.

दरम्यान सध्या कॅगचे प्रमुख असलेले राजीव महर्षी हे वित्त खात्याचे सचिव असतानाच राफेलचा व्यवहार झाला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील याचा सारा तपशील निश्‍चीत करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी सरकारला वाचवण्याचा कसोशीचा प्रयत्न कॅग अहवालात महर्षी हे करतील अशी आशंका कॉंग्रेसने या आधीच व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)