म्हसवड – म्हसवड बसस्थानकाच्या बाजुला एका इस्टीम कारने अचानक पेट घेतल्याने बसस्थानक परिसरात एकच धांदल उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून आगीवर तात्काळ नागरिकांनी व पालिकेच्या अग्नीशामक दलाने नियंत्रण आणून आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.
म्हसवड बसस्थानक चौक ते महात्मा फुले चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या इस्टीम कारने अचानक चालू मध्येच पेट घेतल्याने परिसरात मोठी धांदल उडाली. सदरची ही कार पळशी येथील असून या कारमध्ये सागर भागवत सावंत हे मुंबईहुन एका लग्न समारंभासाठी पळशी या गावी आले होते. ते लग्नाच्या खरेदीसाठी म्हसवड येथे आले होते. खरेदी आटपुन ते पळशी गावाकडे निघाले असता महात्मा फुले चौक ते बसस्थानक चौक या रस्त्यावर कार आली असता कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात मोठी धांदल उडाली. या कारमध्ये पाच जण होते.
यात दोन लहान मुले व तीन मोठी माणसे होती. त्यानी कारने पेट घेतल्याचे बघताच कार मधून बाहेर पळाल्याने जिवीत हानी टळली. ही पेटलेली कार ही गॅस किट असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करून पालिकेच्या अग्नीशामक बोलवण्यात येवून या अग्नीशामकने पेटलेल्या कारच्या आगीवर नियंत्रण आणुन आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.