विडणीत विजेच्या धक्‍क्‍याने शेळी व 2 बोकडं ठार

विडणी – विडणी येथील रामदास छगन आदलिंगे (सावतामाळी मळा, काळुखे वस्ती) यांच्या घराशेजारील गोट्यामध्ये गुरूवारी रात्री 12.30 च्या दरम्यान सिंगल फ़ेज वीज जाऊन थ्री फ़ेज वीज आल्यानंतर अचानक राहत्या घरास व गोट्यास विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यावेळी गोट्यामध्ये असणारी 1 शेळी आणि 2 बोकडे यांचा विजेच्या या तीव्र धक्काने जागीच मृत्यू झाला.

यावेळी शेळ्या ओरडल्याने घरातील मंडळींना जाग येताच त्यांनी गोट्याकडे धाव घेतली. परंतु त्यापूर्वीच शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. या घटनेत कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी झाली नसली तरी आदलिंगे कुटुंबाचा आधार व उपजिविकेचे साधन असणाऱ्या शेळ्या मरण पावल्याने त्यांचे जवळ पास 30 ते 35 हजारांचे नुकसान झाले आहे. येथील थ्री फेज व हाऊस लाईन एकाच खांबावरुन कनेक्‍शन आहे व सद्या पाऊसाची रिमझीम झाल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणने वर्तवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)