पुर्ण नव्हे अंतरीमच बजेट सादर होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे 1 फेबुवारीला अंतरीम बजेट सादर करण्याऐवजी पुर्ण बजेटच सादर केले जाणार आहे तशा सुचना त्यांनी वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे जे वृत्त प्रकाशित झाले आहे त्याचा अर्थमंत्रालयाने इन्कार केला आहे. आम्ही पुर्ण नव्हे तर अंतरीम अंदाजपत्रकच सादर करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

येत्या दोन तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा पार्श्‍वभूमीवर सरकारकडून केवळ अंतरीम अर्थसंकल्प सादर केला जातो पण मोठ्या घोषणा करता येणे शक्‍य व्हावे म्हणून सरकारकडून पुर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल अशा अटकळी बांधल्या जात आहेत. तथापी आज अर्थमंत्रालयाने त्याचा अधिकृतपणे इन्कार केल्यामुळे याविषयीच्या वावड्यांना पुर्ण विराम मिळेल अशी आशा सरकारकडून व्यक्त केली गेली आहे. अर्थमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने एका संकेत स्थळाला ही माहिती दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)