सातारा पालिकेने सादर केलेले बजेट दिशाभूल करणारे : अशोक मोने

सातारा – सातारा पालिकेने सन 2019-20 या वर्षाचे अर्थिक खर्चाचे 245 कोटी 15 लाख 52 हजार 183 रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सोमवारी सभागृहात उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सादर केले. पालिकेच्या तिजोरीत केवळ 4 लाख 65 हजार रुपयांची श्री शिल्लक दाखवण्यात आली. सत्ताधारी यांनी बहुमताच्या जोरावर तुटीचे अंदाजपत्रक सादर केले दरम्यान राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

तुटीचे अंदाजपत्रक सादर करणारी सभा तहकूब करा विरोधकांना आम्ही पाकिस्तान धार्जिणे असल्यासारखी वागणूक मिळत आहे अशी सडकून टीका स्वीकृत नगरसेवक अविनाश कदम यांनी केली. आकडे फुगवून बजेट तयार करण्यात आले. पालिकेने सादर केलेले बजेट हे सातारकरांची दिशाभूल करणारे आहे. तर पालिकेने तुटीचे बजेट सादर करण्यात आले आहे. ही सभा तहकूब करावी अशीही मागणी त्यांनी केली. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी 246 कोटी रूपयांचे बजेट सादर करत बीजभाषण केले. संकल्पातल्या जमा व खर्चाच्या तरतुदी सादर करताना पालिकेची गंगाजळी पावणेपाच लाख रुपये असल्याचे स्पष्ट केले.

अशोक मोने म्हणाले, वसुली केवळ 38 टक्के असताना तुम्ही सातारची विकास कामे करणार, जिल्हाधिकारी यांनी तब्बल 75 टक्के वसुली करावयास सांगितले आहे. पण तशी वसुली होत नाही. बजेटमध्ये आकड्यांची फसवा फसविचा खेळ आहे. यावरून प्रशासनावर सत्ताधारी आघाडीचा वचक नाही हे स्पष्ट होत आहे. जे काही मांडायचे आहे, ते खरे सादर करा. विरोधकांनी दिलेली उपसूचना मंजूर करून पुन्हा बजेट सादर करण्यात यावे, अशी मागणी मोने यांनी केली.
अविनाश कदम म्हणाले, वृक्ष गणना करण्यासाठी लोकांमोफत सहकार्य करायला तयार आहेत.

आपले नेते मातब्बर आहेत. त्यामुळे वृक्ष गणनेसाठी तब्बल 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा पैशांचा अपव्यय आहे. तुझी जिरवली का? माझी जिरवली यांतच आपलं आयुष्य चालल आहे. आम्ही विरोधक पाकिस्तानमधून आलो आहे, अशी वागणूक सत्ताधारी देत आहेत. सातारच्या विकासाला खीळ बसली आहे. हे बजेट फक्त अनुदानाचे बजेट आहे. अनुदान बंद झालेतर पालिका बंद करावे लागेल. महसूल वाढीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे हे बजेट तुटीचे असून ही सभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

भाजप नगरसेविका सिद्धी पवार म्हणाल्या, मार्च महिन्यात होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन बजेटमध्ये पाणी टॅंकरसाठी तरतूद करण्यात आली नाही. शहरात कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचा प्रश्न चिघळत चालला आहे. पेमेंट मिळत नसल्याने घंटागाडी चालकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी कचरा रस्त्यावर टाकायचा का? असा सवाल उपस्थितीत करून पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक दत्ता बनकर यांनी सादर केलेले बजेट सातारकराच्या हिताचे कसे आहे, हे सांगितले. अशोक मोने, अविनाश कदम, अमोल मोहिते आपण यापूर्वी बजेट मांडली आहेत. अशोक मोने तुम्ही तर बजेट मांडण्यात भीष्माचार्य आहे, त्यामुळे अधिक बोलत नाही असे सांगितले.

राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप उन्हाळ्यात टॅंकर उपलब्ध होत नाहीत असा घणाघात भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी केला. त्यावरून पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर व नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांची जोरदार खडाजंगी झाली. दोघांचा वाद वाढत्च गेल्याने वातावरण तप्त झाले. नगराध्यक्ष माधवी कदम सुद्धा खंदारे यांच्या अखंड बडबडीवर संतापल्या. मात्र रेकॉर्डवर अचानक राष्ट्रगीत सुरु झाले. आणि नगरसेवक अचानक उठून उभे राहिले. तरी आंबेकर व खंदारे यांची खडाजंगी सुरूच होती. त्यामुळे राष्ट्रगीत अवमान प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)