मोदींना निवडणुकीत आव्हान देणार ‘तो’ बीएसएफ जवान 

नवी दिल्ली – सीमेवर तैनात असलेल्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, असा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकणारा सीमा सुरक्षा दलातील निलंबित जवान तेज बहादूर यादव आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महत्वाचे म्हणजे वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  तेज बहादूर यादव आव्हान देणार आहेत.

जानेवारी २०१९ मध्ये तेज बहादूर यादव यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाचा भांडाफोड करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर बीएसएफने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. सीमा सुरक्षा दलातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीच मी तो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. सैन्यात सीमेवर कार्यरत असताना माझी छळवणूक करण्यात आली होती. भ्रष्टाचार संपविण्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. मी सुद्धा त्याकडेच लक्ष वेधले होते. परंतु, माझीच चौकशी करण्यात आली,असा खेद तेज बहादूर यादव यांनी व्यक्त केला आहे. आता  तेज बहादूर यादव यांनी मोदींविरोधात अपक्ष निवडणूक लढून सैन्यदलात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा मानस आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मिरच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. देशाचे रक्षण करण्यासाठी जे जवान अहोरात्र तैनात असतात. त्यांच्या जेवणाकडे नीट लक्ष दिले जात नाही, असे  तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओमध्ये सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)