ब्रेक्‍झिट वादाच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदावली

लंडन : ब्रेक्‍झिटच्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. सन 2018 च्या आकडेवारीनुसार ब्रिटनचा जीडीपी गेल्या सहा वर्षातील नीचांकी पातळीवर गेला आहे. ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन समुदायातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव संसदेत मतदानासाठी मांडला होता पण तो ब्रिटीश संसदेने फेटाळून लावला आहे.

त्यानंतर या विषयीच्या अनिश्‍चततेच्या वातावरणात खूपच भर पडली असून त्या देशाच्या सेवा क्षेत्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ब्रिटनच्या अन्य आर्थिक व्यवसायावरही या वातावरणाचा चांगलाच परिणाम झाला असून त्यातच जागतिक मंदीच्या वातावरणाचाही ब्रिटीश अर्थव्यवस्थेला सामना करावा लागत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ब्रिटनपुढे अनेक महत्वाचे आर्थिक प्रश्‍न उभे राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)