चीन बांधणार पनामा कालव्यावर पूल

पनामा शहर (पनामा): जगप्रसिद्ध पनामा कालव्यावर चीन पूल बांधणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पनामा भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पनामा सरकारने तशी घोषणा केली आहे. पनामा कालव्यावरील पूल बांधण्याच्या या प्रकल्पामुळे चीन आणि पनामा या दोन देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असे पनामाचे अध्यक्ष जुआन कार्लोस वारेला यांनी म्हटले आहे. लॅटिन अमेरिकेतील देशांबरोबर राजकीय आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी शी जिनपिंग पनामात आले होते.

पनामा कालव्यावर पूल बांधण्याचे काम चीनच्या एका उद्योगसमूहाला देण्यात आले आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान असलेला, सामरिक महत्त्वाचा पनामा कालवा अटलांटिक आणि पॅसेफिक महासागरांना जोडण्याचे काम करतो. यावर बांधण्यात येणाऱ्या पुलाचा हा प्रकल्प 1.4 अब्ज डॉलर्सचा आहे. हा प्रकल्प मिळवताना चिनी उद्योगसमूहाने स्पेन, इटली, दक्षिण कोरिया आणि चीनच्याही इतर कंपन्यांवर मात केली आहे. पनामा हा चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पात सहभागी होणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)