मेलबर्न – शुक्रवार दिनांक 12 जुलै पासून बेपत्ता असलेल्या पोशिक शर्मा या भारतीय मुलाचा मृतदेह व्हिक्टोरिया येथील मेरिसव्हिले येथे आज (सोमवार दि. 15) सकाळी झुडपांमध्ये सापडला आहे.
पोशिक शर्मा हा 21 वर्षीय मुलगा गुरूवारी मध्य रात्री पासून बेपत्ता होता. त्याच्या शोधा साठी स्थानिक पोलिसांनी शोधकार्याचे आयोजन केले होते. ज्यात 90 जणांचा समावेश होता. यावेळी घेण्यात आलेल्या शोध मोहिमेत त्या ठिकाणी असलेल्या धरणाला रिकामे करण्यात आले होते. मात्र, त्याचा मृतदेह मेरिसव्हिले भागात सापडला.
चार दिवसांपुर्वी शर्माहा या ठिकाणी असलेल्या एका पबमध्ये आपल्या मित्रांसोबत आला होता. मात्रांसोबत झालेल्या एका किरकोळ वादानंतर तो एकटाच येथून बाहेर पडला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. यानंतर हे शोध कार्य राबवणारे पोलिस अधिकारी डेव्हिड रायन यांनी सांगितले की, आम्ही शर्मा याच्या कुटूंबियांना याची माहिती दिली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली जाईल.
या संदर्भात अधिक माहिती देताना रायन म्हणाले की, मेरिसव्हिले येथील एका क्लबमध्ये शर्मा हा आपल्या मित्रांसोबत पूल खेळत होता. त्यावेळी एका किरकोळ कारणामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे शर्माने तेथून बाहेर पडने पसंत केले आणि तिथून निघून गेला. मात्र, त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास तो सापडला नाही.