भाजपचे सर्वात आक्रमक प्रवक्ते संबित पात्रा पुरीतून रिंगणात

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने 36 उमेदवारांची जी तिसरी यादी प्रकाशित केली आहे त्यात ओडिशातल्या पुरी मतदार संघातून पक्षाचे आक्रमक प्रवक्ते संबित पात्रा यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्याखेरीज या यादीत बहुतांशी उमेदवार आंध्रप्रदेशातील आहेत.

संबित पात्रा यांच्या उमेदवारीची विशेष चर्चा माध्यमांमध्ये आहे. कारण गेली चार वर्षे ते प्रसार माध्यमांतून अत्यंत आक्रमकपणे भाजपची बाजू लाऊन धरताना कॉंग्रेसवर तुटून पडत असत. काही वेळा त्यांच्या अति आक्रमक शेैलीने ते स्वता अडचणीतही आले आहेत, पण टीव्हीवरील न्युज चॅनेलमध्ये सतत दिसणारा हा चेहरा असल्याने त्यांच्या उमेदवारीला वेगळे ग्लॅमर आले आहे. ओडिशातला पुरी मतदार संघ त्यांच्या वाट्याला आला असला तरी त्यांना तेथे बिजू जनता दलाच्या उमेदवाराशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)