लोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी 

चम्फाई: आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष विजयी होणार नाही याची कल्पना संघ आणि भाजपलाही आली आहे असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज मिझोराम मधील निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. भाजप आणि संघ परिवाराने मिझोरामची सांस्कृतीक ओळख मिटवण्याचे काम केले असल्याची टीकाही त्यांनी केली.

निवडणुक ही आपल्याला मिझोराम मध्ये घुसखोरी करून तेथील संस्कृती नष्ट करण्याची शेवटची संधी आहे या भूमिकेतून भाजप, संघाचे लोक या येथे उतरले आहेत. पण आपण पुढील लोकसभा निवडणुकीत जिंकूच शकत नाही याची कल्पना त्यांनाही आली आहे असे असे ते यावेळी म्हणाले. मिझोराम मधील मिझो नॅशनल फ्रंटने भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की मिझो नॅशनल फ्रंट सारख्या संघटनेने संघ परिवारातील संघटनेशी हातमिळवणी करावी हे दुर्देवी आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी राफेलच्या भ्रष्टाचाराचा विषयही उपस्थित केला. मिझोराम मधील लाल थानहावला सरकारच्या दहा वर्षाच्या कारभाराचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की या सरकारने राज्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न दुप्पट केले आहे. आमचे सरकार पुढील वर्षी राज्यातील 11 हजार लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आपण 1987 साली आपले वडिल राजीव गांधी यांच्या समवेत या राज्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आलो होतो त्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

मिझोरामच्या रस्त्यावरून आपल्या वडिलांनी मला गाडीतून फेरफटका मारून आणले होते. निवडणुकीनंतर मी पुन्हा या राज्याच्या रस्त्यावर स्वत: गाडी चालवत येईन आणि तुम्हाला भेटीन असे त्यांनी यावेळी नमूद केले त्यावेळी उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)