केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मोदी सरकारची मोठी भेट ! महागाई भत्ता वाढविला 

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्यांना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे.  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. महागाई भत्ता 9% वरुन 12% वर वाढविण्यात आला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2019 पासून  लागू होईल. या निर्णयामुळे सरकारला 1968 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार होणार आहे.

कॅबिनेटच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, दिल्ली-गाझियाबाद-मेरठ क्षेत्रीय रॅपिड ट्रांझिट सिस्टम (आरआरटीएस) बांधण्याचे प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केला. याचा सरकारच्या तिजोरीवर 30,274 कोटी रुपये भार पडणार आहे.  कॅबिनेट बैठकीत अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज -2 मंजूर करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)