पिंपळवडीकरांची हुशारी! दोन नेत्यांच्या भांडणाचा असाही लाभ

आळेफाटा – आळे-भटकळवाडी या रस्त्याच्या कामावरून जिल्हा परिषद गटनेते शरदराव लेंडे व आमदार शरद सोनवणे यांच्यामध्ये श्रेयवादावरुन लढाई सुरू आहे; मात्र लेंडे व सोनवणे हे होघेही एकाच गावातील असल्यामुळे हे श्रेय फक्‍त पिंपळवंडीकरांचेच असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

आळे-भटकळवाडी-वडगावकांदळी-हिवरेतर्फे नारायणगाव या रस्त्याच्या दुरूस्ती मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या रस्त्याचे उद्‌घाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे यूवानेते अतूल बेनके व सरपंच उपसरपंच व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले होते. तर रस्त्याच्या कामाचे फलक जिल्हा परिषद गटनेते शरद लेंडे व आमदार शरद सोनवणे यांनी हे काम आमच्या निधीमधून झाले असल्याचे वेगवेगळे फलक लावले आहेत, त्यामुळे आमदार सोनवणे व लेंडे यांच्यामध्ये या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे त्यामुळे हा रस्ता नक्‍की कुणाच्या निधीमधून मंजूर झाला आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सोशल मीडिया प्रमुख विजय कुऱ्हाडे व आळे येथील काही ग्रामस्थांनी हा रस्ता शरद लेंडे यांच्या प्रयत्नामधून झाला असल्याचे प्रसारमाध्यमातून सांगितले. तर श्रेयवादाच्या लढाईचे वृत्त व पोस्ट सोशल मीडियावरही फिरत होत्या, त्यामुळे या कामाचे नक्‍की श्रेय कुणाला द्यायचे, असा प्रश्‍न जुन्नरकरांच्या मनात घोळत होता.

दरम्यान, या श्रेयवादावरुन सुरू झालेली लढाई थांबविण्या करीता पिंपळवंडीकरांनीच या वादात उडी घेतली आणि शरद लेंडे व आमदार शरद सोनवणे हे दोघेही पिंपळवंडी गावचे सुपुत्र असल्यामुळे व दोघेही राजकीय पदाधिकारी असल्यामुळे हे काम दोघांपैकी कुणीही करो, पण या कामाचे श्रेय पिंपळवंडी गावचेच आहे, अशी पोस्ट टाकून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे श्रेयावादाबाबत पिंपळवंडीकरांच्याही हूशारीला दाद द्यावीच लागेल एवढे मात्र खरे!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)