पुणे – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 31उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद होणार आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सकाळी पत्नी व कुटुंबियांसह सॅलीसबरी पार्क येथील ह्युम मॅकहेंरी स्कुलमध्ये मतदान केले. त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर नागरिकही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीतर्फे गिरीश बापट तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून मोहन जोशी हे रिंगणात आहे.
मतदारांसाठी हेल्पलाइन
020-26121231/71/81/91