विमान अपहरण करण्याचा प्रयत्न फसला ; सर्व प्रवाशी सुखरूप

ढाका: बांगलादेश एअरलाइन्सचे विमान अपहरण करण्याचा प्रयत्न फसला आहे. या विमानात १४२ प्रवासी होते. माहितीनुसार विमान ढाका ते दुबईला जात असतांना अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या माहितूनसार एका बंदूकधारकांनी विमान अपहरण करण्याचा प्रयत्न केला. विमानात बंदूकधारक असल्याचे काळताच चितगाव येथे विमानाचे इमरजेंसी लँडिंग करण्यात आले.

पोलिसांनी विमानावरील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. मात्र विमान चालक दलाचे २ सदस्य आणि बंदूकधारक अजूनही विमानात आहेत. पोलीस आणि सैनिकांनी विमानाला चारीबाजूने घेरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)