अल्पवयीन तरुणीचा गळा चिरणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलीच्या प्रकृतीत सुधारणा, तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

कराड – अल्पवयीन मुलीचा गळा चिरून, तिच्या दोन्ही हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या संशयीत युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अजय सुनील गवळी, असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्याच्यावर सातारच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी संशयित युवकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही घटना दोन कुटुंबातील वाद की अन्य कोणत्या कारणाने घटना घडली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्याप्रकरणी संशयित अजय सुनील गवळी, त्याची आई सुनीता सुनील गवळी व बहीण सौ. नीलम बाबर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. संशयित अजय गवळी याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना अजय सुनील गवळी याने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून तिचे तोंड हाताने दाबून तिच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. यासाठी अजयला आई व बहिणीने सहकार्य केल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग कापसे तपास करत आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी वारुंजी फाटा परिसरात अजय गवळी याने विषारी औषध घेतल्याचे समजताच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला सातारच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)